पालघर प्रतिनिधी धनेश क्षिरसागर
महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिन 'साजरा करण्यात आला व १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत व महसूल सप्ताह साजरा होत आहे. या अंतर्गत दिनांक ३ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी पालघर व तहसीलदार पालघर यांचे मार्गदर्शनाखाली बोईसर मंडळातील मौजे कल्लाळे येथील पाणंद रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार संभाजी पावरा , मंडळ अधिकारी बोईसर विजय गुंडकर, ग्राम पंचायत मान सरपंच सौ. अंजली संदीप भावर व ग्राम महसूल अधिकारी अभिषेक भरत पाटील, सुरेश घारे, सुरेश जाधव, सुस्मित गडग, अजित गावित, विनायक जनाठे तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ सुरेखा सुरेश भोईर, सौं. कोमल किरण जाधव, श्रीमती प्रीती बारकू बाबर, श्री चेतन हरिभाऊ चुरी ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप विष्णू भावर निवृत्त कृषी कृषी कर्मचारी शांताराम रावते, परशुराम रावते हर्ष प्रशांत पाटील सदानंद खटाळी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Social Plugin