आलेवाडी, ता. अकोट
श्रावण महिन्यातील पवित्र दुसऱ्या सोमवारी आलेवाडी (ता. अकोट) येथे श्री नीलकंठेश्वर महादेवाच्या जलाभिषेकासाठी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गांधीग्राम येथील पवित्र पूर्णा नदीवरून जल आणून गावात मिरवणूक काढण्यात आली. या भक्तिमय सोहळ्यात युवक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
ही यात्रा श्री महेश वानखडे, ओम जावरे, विकी वानखडे, अजय वानखडे आणि अक्षय वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या नियोजन व पुढाकारामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व भक्तिभावाने पार पडला.
पूर्णा नदीवरून जल आणून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिरापर्यंत नेण्यात आली. “हर हर महादेव”च्या जयघोषांनी वातावरण दुमदुमले होते. गावातील विविध ठिकाणी यात्रेचे स्वागत व पुष्पवृष्टी करण्यात आली.
यात्रेची सांगता श्री नीलकंठेश्वर महादेवाच्या जलाभिषेकाने करण्यात आली. आलेवाडीतील युवक मंडळ, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.
Social Plugin