मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाल
मालेगाव :-महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात 3 ऑगस्ट रोजी तालुक्यातील मेडशी, मुंगळा, किन्हीराजा, करंजी, शिरपूर आणि चांडस या आठही महसूल मंडळांमध्ये विशेष उपक्रमांतर्गत अतिक्रमित रस्ते मोकळे करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी तहसीलदार दीपक पुंडे, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गजानन नागरे, नायब तहसीलदार अरविंद करांगळे, सुनील देशमुख, रंजना गोरे, सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, संबंधित गावांचे सरपंच, पोलीस पाटील, व संबंधित गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे रस्ते अतिक्रमण मुक्त झाले असून पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पाऊल उचलले गेले आहे. ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असून महसूल विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
Social Plugin