राजपाल बनसोड तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : महसूल दिनाचे औचित्य साधून एक ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा महसूल विभागाकडून महसूल सप्ताह म्हणून राबविण्यात येत असताना महसूल विभाग जेवढा महत्त्वाचा तेवढाच महसूल व पोलीस प्रशासनात साठी गावकामगार पोलीस पाटील हा सुद्धा महत्त्वाचा भाग असून प्रशासनास या गावकामगार पोलीस पाटलाची गाव पातळीवर तसेच शहर पातळीवर यांच्या कामगिरी महत्त्वाची असते आणि प्रशासनात काम करत असताना उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन देऊन त्याचा उत्साह वाढविण्याची परंपरा महसूल विभागात असल्याने या महसूल दिनी दिग्रस तालुक्यातील 24 25 या वर्षात महसूल प्रशासनांतर्गत त्यांचे पदाला नेमून दिलेल्या विविध क्षेत्रात एकंदरीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हास्तरावर दिग्रस तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील महिला पोलीस पाटील शितल गावंडे यांचा मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन महिला पोलीस पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अनिल खंडाळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे तहसीलदार राहुल मोरे अधीक्षक आदित्य शेंडे व कर्मचारी उपस्थित होते





Social Plugin