Ticker

6/recent/ticker-posts

अनेक महिन्यापासूनच्या संघर्षाला यश पाटण -पंढरकवडा बस सेवा अखेर सुरु.



प्रतिनिधी :-सागर इंगोले 

झरी तालुक्यातील पाटण परिसरातील नागरिकांना, शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या कित्तेक वर्षांपासून या मार्गाला पाटण ते पंढरकवडा ही बस सेवा नसल्यामुळे येथील नागरिक व विद्यार्थी, व्यापारी,व या परिसरातील व्यवसायिक,यांना अद्यापपर्यंत ही बस सेवा नसल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकाळाची मागणी आणि मागील काही महिन्यापासून चालू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले आहे. प्रशांत निमसरकर व पवन खुशाल कुळसंगे मित्रपरिवार व मा. लोकप्रिय आमदार संजय देरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी सातत्याने प्रशासनाकडे केलेल्या निवेदन चर्चासत्र आणि पाठपुराव्याचे फलित म्हणून पाटण ते पांढरकवडा बस सेवा सुरू करण्यात आली आहे

 या सेवेचा लाभ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,शेतकरी, कामगार, उद्योगपती, व्यावसायिक, आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. यामुळे पाटण गावाचा मुख्य शहराशी संपर्क सुखकर होणार आहे. आर्थिक व सामाजिक विकासाला ही या बसमुळे चालना मिळेल.

 ग्रामस्थांच्या भावना:

ही " ही सेवा आमच्यासाठी वरदान ठरणार आहे प्रशांत भाऊ व पवन भाऊच्या प्रयत्नामुळे आम्हाला हा प्रवास करण्याचा हक्क मिळाला आहे."

 स्थानिक सातपल्ली ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आला.....

  याप्रसंगी ग्रामस्थांनी  प्रशांत निमसरकर पवन कुळसंगे व त्यांच्या मित्र परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले त्यांचा मित्रपरिवार अनिल मोहोजे, राजूभाऊ लक्षटीवlर, प्रशांत निमसरकर,पवन कुरसंगे,दत्ताभाऊ पताके, सुनील भाऊ शिरपूर,बापूरावजी लक्षठीवार, ज्ञानबाजी धोटे गोवर्धन मेंगावार  (तंटा मुक्ती अध्यक्ष ) निखिल लक्षती वार,  वेदांत बेनपेलीवार,प्रशांत नगराळे, दत्ता मेंडपटलावार, विक्रांत कोतपल्लीवार, सचिन सिद्धमवार, अक्षय कोतपल्लीवार प्रवीण धोटे, आकाश दुर्लावार, सचिन मेंडपलावार, नितीन आत्राम संस्कार येअर मी राकेश बावणे व प्रशांत निमसरकर मित्रपरिवार सतपली यांनी ही बस सेवा सुरु कारण्याकरिता गेल्या काही महिन्यापासून सतत पाठपुरावा करून या मित्रपरिवारानी खुप योगदान दिले.