एक लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक अभिनेत्री सोनाली कुळकर्णी यांची उपस्थिती
साथ फाऊंडेशन व रोहित भाऊ बोम्मावार मित्र परिवार सावली तर्फे आयोजन सावली शहरात प्रथमच साथ फाऊंडेशन व रोहित भाऊ बोम्मावार मित्र परिवार सावलीच्या वतीने गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १ लाख रुपये बंटी भाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा मतदार संघ यांचेकडून तर द्वितीय पारितोषिक ५१ हजार रुपये रोहित भाऊ बोम्मावार संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचेकडून देण्यात येणार आहे.
दिनांक १९/०८२०२५ रोज मंगळवारी सायंकाळी ४ वाजेपासून पंचायत समिती सावली समोरील भव्य पटांगणावर या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
या स्पर्धेकरिता प्रमुख आकर्षण म्हणून महाराष्ट्राची प्रसिद्ध सिने अभिनेत्री अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत, तसेच मुंबई येथील प्रसिद्ध गायिका इशरत जहाँ यांची बहारदार गाणी सादर होणार आहेत. या दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन चिमूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे राहणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोफत प्रवेश आहे तर अधिक माहितीसाठी ९४२२८३८७२५ या क्रमांकावर संपर्क साधावा व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साथ फाऊंडेशन व रोहित भाऊ बोम्मावार मित्र परिवार सावली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Social Plugin