प्रवास्याने बस मधे विसरलेले साढे चार लाख रुपयाचे दागिनी केले परत!!
*मन्सूर शहा. धोत्रा.भनगोजी
सविस्तर वृत्त असे की, बुलढाणा जिल्ह्यातिल डोंगरशेवली येथिल सुपुत्र वसीम सलीम शेख हेमुरबाड आगार ठाणे विभाग येथे बस चालक म्हणुन कार्यरत आहे. चालक वसीम सलीम शेख हे आज दि.21 ऑगस्ट रोजी त्यांची नियोजित ड्युटी कल्याण ते अक्कलकुवा करत असतांना एका महिलेची बॅग कॅबिनमध्ये राहिली व ती वसीम शेख यांनी अक्कलकुवा मध्ये जाऊन बघितली असता त्या बॅगमध्ये तीन तोऴे सोन्याचे हार, चार ग्रॅम सोन्याची अंगठी व सात हजार कॅश असे एकूण सुमारे साढेचार लाख रुपए चे ऐवज व आधार कार्ड होते बॅग मधे होते.
वसीम शेख यांनी शहदा डेपो ला कॉल करुन त्या आधार कार्ड वरून महिलेचा पत्ता सांगून महिलेची संपर्क साधला, व महिलेला शहादा डेपो मध्ये दुसय्रा दिवशी बोलवून घेतले, व तीचे सोन्याचे हार ,सोन्याची अंगठी व कॅश रक्कम परत दिली. त्या महिलेने वाशिम शेख यांना पाच हजार रूपए बक्षीस म्हणून घेण्यास प्रवृत्त केले असता वसिम शेख यांनी ते बक्षिस घेण्यास नकार दिले व एस टी महामंडळाच्या प्रतिमेचा मान राखूला. मागील वर्षालाही एका कोकण मधिल प्रवास्याने बस मधे विसरलेले साढे तीन लाख रुपए कॅश हे वसीम शेख यांनी सदर प्रवास्याला परत केल्याचे वृत्त ही आहे. नेहमी जणतेची सेवा व प्रामाणिक पणामुळे वसीम शेख यांनी डोंगरशेवली गावाचे व मुरबाड डेपोचे नाव पुन्हा रोशन करून दाखवले ,करिता मुरबाड डेपो मॅनेजर योगेश मुसळे यांनी वसीम शेख यांचे कौतुक केले आहे.





Social Plugin