कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
मंठा: सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते प्लेट ठेवण्याचे स्टँडची पूजन व रिबिन कापून व स्वागत गीतांनी करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे मार्गदर्शक बाबुजी तिवारी, प्रमुख उपस्थिती नारायण दादा बोराडे, विठ्ठल वंजारी सर, परमेश्वर कुलाल, रामदास ढवळे, आयोजक सामाजिक कार्यकर्ता राजू वाघमारे व ह.भ.प. रामेश्वर नालेगावकर महाराज हे होते,
बाबुजी तिवारी मार्गदर्शन करत असतांना सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी अध्यात्म्यातून विज्ञान निर्मिती झाली या विषयावर सखोल अशी मार्गदर्शन केले, तसेच मंठा शहरातील राजू वाघमारे एक सामाजिक कार्यकर्ता घडतोय खूप मोलाची गोष्ट आहे कारण प्रत्येक समाजातून एक सामाजिक कार्यकर्ता घडवा व त्यांच्या हातून सामाजिक कार्य घडावे व पुढील भविष्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
ह.भ.प रामेश्वर नालेगावकर महाराज बोलत असताना त्यांनी संस्थेबद्दल थोडक्यात सांगितले त्यामध्ये किती सक्सेस स्टोरी झाल्या त्या सांगितल्या व यापुढेही संस्थेतून खूप चांगले विद्यार्थी घडतील असे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केले व ग्रामीण भागातील राजू वाघमारे यांच्या सारखा सामाजिक क्षेत्रामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि सामाजिक कार्यकर्ते घडले पाहिजे समाज प्रेमी अशा कार्यक्रम घेतले पाहिजे जेणेकरून समाजातील छोट्या छोट्या अडचणी दूर होतील असे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितलं व सर्व यांचे आभार व्यक्त केले.





Social Plugin