शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - ( शैलेश जाधव)
शिरुर शहरातील नागरिकांना सरकारी दार ठोठावण्यासाठीसुद्धा मोठी कसरत करावी लागत आहे. तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासमोर ऐन पावसाळ्यात साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कार्यालयात ये-जा करण्यासाठी नागरिकांना अक्षरशः चिखल आणि डबक्यांमधून वाट काढावी लागत असून याकडे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मात्र अजिबात लक्ष नाही.
यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीचा निषेध नोंदवला आहे. "शिरुर तलाठी कार्यालयात जर अशीच अवस्था राहणार असेल तर येथे 'नावाडी' ही नवीन पोस्ट काढावी आणि नागरिकांना होडीतून कार्यालयात आणावे," अशा खोचक शब्दांत नागरिकांनी प्रशासनावर टीका केली आहे.
आता या गंभीर समस्येवर शिरुर तलाठी कार्यालय कोणती उपाययोजना करते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin