Ticker

6/recent/ticker-posts

गोरेगाव येथुन आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांसाठी 25 क्विंटल पुरी 2 क्विंटल मिरचा ठेचा मुंबईला रवाणा

 


भागवत खांदळे ग्रामीण गोरेगाव  प्रतिनिधी 

मुंबई येथे मनोज जरागे पाटील यांच्या  मराठा आरक्षणाचा तिसरा दिवस मराठा आंदोलकांना उपाशी पोटी राहु नये याकरिता गोरेगाव इथून मराठा आरक्षण आंदोलनासाठी  जे बांधव मुंबईला गेलेले आहेत त्यांच्यासाठी उद्या पंचवीस क्विंटल पुरी व 2 क्विंटल ठेचा करून रवाणा  गोरेगाव   येथून पंचवीस क्विंटल पुरी करून पाठवण्यात येणार आहे सर्व गावकरी मंडळी यामध्ये सहभागी झालेले आहे मुंबई येथे आंदोलन चालू असून तेथे हॉटेल बंद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर आंदोलकांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून गोरेगाव    येथील मराठा बांधवांनी आंदोलकांना  गोरेगाव येथून पुऱ्या व ठेचा तयार करून आंदोलन उपाशी राहू नये याकरिता पाठविण्यात आला आहे .एक स्तुत्य बाब आहे यासाठी  मराठा आंदोलकांना  बळ निर्माण व्हावे यासाठी मराठा बांधव उपाशी राहू नये याकरिता समाजाचे बांधवांना आवाहन केले व 25 क्विंटल पुरी व ठेचा  मुंबईला रवाना करणार आला आहे