ग्रामीण प्रतिनिधि ,मोहम्मद रफी मदार आदमपुरकर
मौजे खरब खंडगाव ता. मुखेड जि. नांदेड येथे जगतविख्यात साहित्यिक साहित्याचा बादशहा साहित्य सम्राट साहित्य रत्न डॉ. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 105 वी जयंती विविध स्तुत्य उपक्रमाणी झाली साजरी.
दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रणजित काळे साहेब (सरपंच तथा पोलीस पाटील प्र.) होते तर उदघाटक मा.गणपतजी गायकवाड साहेब मा नगराध्यक्ष नगर परिषद मुखेड हे होते दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे अध्यक्ष मा. विरभद्र हिमगीरे साहेब (शिवप्रसाद नर्सिंग कॉलेज चे संस्थापक) हे होते तर उदघाटक मा नारायण गायकवाड साहेब डी फार्मसी कॉलेज खरब खंडगाव संस्थापक अध्यक्ष हे होते या कार्यक्रमाला मुखेड कंधार विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड साहेबांची उपस्थिती लाभली.
खरब खंडगाव येथे दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी लेखणीचा बादशाहा,साहित्याची खान,साहित्य सम्राट डॉ. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त सकाळी ठीक 10:30 वाजता जुनेगाव मातंग वस्ती अण्णा भाऊ साठे सभागृह खरब खंडगाव येथे लाल ध्वजाचे ध्वजारोहण खरब खंडगाव नगरीचे भूमिपुत्र मा.श्री ओमकार सदाशिव पा. एकाळे साहेब (उपजिल्हाधीकारी यवतमाळ) यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. तसेच ठीक 11.30 वाजता साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे स्मारक नवीआबादी साठे नगरयेथे खरब खंडगाव नगरीचे दुसरे भूमिपुत्र मातंग समाजाची अस्मिता मा.श्री.भास्करजी सोपानराव कांबळे (सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब गडचिरोली) यांच्या शुभ हस्ते लालध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले. मौजे खरब खंडगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्य सम्राट डॉ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याना पुष्पहार घालून पुज्या करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वृक्षरोपणाचा कार्यक्रम, सत्काराचा कार्यक्रम, शालेय गुणवंत विध्यार्थ्यांचा गुंणगौरव सोहळा, शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आणि व्यख्यांनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात अण्णा भाऊ साठे यांचे विद्यापीठ या गाण्यावर जि. प. के. प्रा. शाळा खरब खंडगाव येथील विध्यार्थी आणि विद्यार्थिनी लेझीम नृत्य सादरीकरनाणे झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिन्द्रनाथ गवाले साहेब ( समाज प्रबोधन व्याख्याते) हे होते तर प्रमुख पाहुणे गणपत गायकवाड माजी नगराध्यक्ष नगर परिषद मुखेड हे होते तर विशेष सत्कार मूर्ती भूमिपुत्र ओमकार सदाशिव एकाळे (उपजिल्हा धिकारी यवतमाळ) मा. भास्कर सोपानराव कांबळे (सहाय्यक पोलीस निरीक्षक गडचिरोली) मा. बालाजी शिवदास पा काळेवार (सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक साहेब) मा. यु. एस. सिरसे साहेब (ग्राम विकास अधिकारी ) सरपंच डॉ रणजित काळे साहेब, विश्वजित काळे,साहेब, उपसरपंच पांडुरंग कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, काशिनाथ एकलारे ग्रामपंचायत अधिकारी बीरू साहेब, माजी सरपंच पांडुरंग जाधव पा. माजी सरपंच संजय जाधव,माजी सरपंच बालाजी जाधव माजी सरपंच हणमंत कांबळे ,शिवाजी गणपत कांबळे माजी ग्राम पंचायत सदस्य बाबुसाहेब कौठेकर मा. मारोतराव जाधव,माजी पोलीस पाटील योगेश्वर पा.जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष प्र. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खरब खंडगाव येथील सर्व शिक्षक वृंद चातगिळे सर, पेठकर सर, मुळे मॅडम, अ्चिंतलवार मॅडम कुमुठकर मॅडम, मिरजगावे मॅडम शालेय शिक्षण समिती अध्यक्ष उपाध्यक्ष दीपाली चंद्रकांत कांबळे बेबीताई अंगणवाडी सेविका,आशाताई, नामदेव पा.जाधव गणेश जाधव, हणमंत कोठेवाड,धोंडोबा गायकवाड, बळीराम तरटे गणेश तरटे चंद्रकांत कांबळे मारोती चांदु कांबळे, राजाराम एकनाथ कांबळे जितेंद्र येलमे, अविनाश कांबळे, आकाश कांबळे, काशिनाथ कांबळे, गावातील प्रतिष्ठित मंडळी मातंग समाजातील बंधु आणि भगिनी आपण सर्वजण कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्धल तुम्हा सर्वांचे जाहीर आभार.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, प्रास्ताविक आणि आभार श्री परमेश्वर तुळशीराम तरटे मा. उपसरपंच प्र. यांनी केले. दुपारी ठीक 4:00 वाजता साहित्य सम्राट डॉ. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या तैल चित्राची भव्य मिरवणूक मुख्य रस्त्याने निघाली या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे नागरिक सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मातंग सर्व मातंग बंधु पुरुष मंडळी विशेषतः समाजातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. सायंकाळी मिरवणूक संपल्यानंतर सर्व मंडळींनी भोजनाचाआस्वाद घेतला. *आयोजक :-साहित्य सम्राट डॉ. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जन्मोत्सव समिती खरब खंडगाव..! *अध्यक्ष शिवानंद तरटे, उपाध्यक्ष बालाजी कांबळे, सचिव सुरेश कांबळे, सहसचिव अजय कांबळे कोशाध्यक्ष विशाल कांबळे सहकोश्याध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, सदस्य गजानन कांबळे अजय कांबळे नागेश कांबळे कैलास तरटे, विकास कांबळे,गंगाधर तरटे सुरेश तरटे सर्व मंडळी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे सर्वांचे आभार मानतो..* 🙏





Social Plugin