Ticker

6/recent/ticker-posts

हिप्परगा थडी येथील गणेश मंडळास पोलिस उपनिरीक्षक पंतोजी साहेबांनी दिली भेट.



 बिलोली प्रतिनिधी राजेश अमेटवार

हिप्परगा थडी - महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा सण म्हणून युवा वर्ग गणेशोत्सव हा सण साजरा करतात. मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पा चे आगमन करतात.जगभरात बरेच ठिकाणी जातीभेद बाजुला ठेवून सर्वधर्म समभाव या विचारधारा उराशी बाळगून संपूर्ण देशात गणपती उत्सव म्हणजेच गणपती बाप्पा ला भव्यदिव्य असे मंडप सजवुन बसविण्यात येते.बाजारपेठांमध्ये भाविकांनी लहान मोठ्या रंगीबेरंगी गणेशमूर्ती खरेदी करतात.दुकांनामध्ये पुजाथाळी ,मोदकांचे साचे आणि इतर सजावटीच्या वस्तू ही मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. या ग्रामविकास गणेश मंडळाचे अध्यक्ष किरण तंगनोड, उपाध्यक्ष बालाजी महाजन, सचिव महेश तुकडे, कोषाध्यक्ष अजगरे सोनु पाटील, सदस्य भुरे माधव, तुकडे बाबु तसेच गावातील युवा वर्ग सर्वांनी मिळून मुर्ती स्थापन केले.आणि रोज सकाळ संध्याकाळ श्री ची आरती केली जाते. 

या ग्रामविकास गणेश मंडळाचे गणपती बाप्पा चे विसर्जन नऊ दिवसांनी म्हणजे दि.०४/०९/२०२५ रोज गुरूवारी होणार आहे.त्यासाठी कुठल्याही प्रकारची कर्कश अश्या ध्वनी चे साऊंड ,डीजे लावु नये आणि कुठलेही भांडण , गोंधळ होऊ देऊ नये शांतता बाळगुन सर्वांनी प्रेमाभावाने श्री चे विसर्जन करावे असे सुचना बिलोली पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक श्री पंतोजी साहेब यांनी मंडळास दिले . सोबत पोलिस कर्मचारी श्री आंबेवार साहेब होते यावेळी उपस्थित पोलीस पाटील शंकर अप्पा मठपती, मठवाले संतोष, अजगरे हाणमंत,धनुरे पवन इत्यादी त्या ठिकाणी उपस्थित होते.बाल गोपाळ महिना पंधरा दिवसापासूनच वर्गणी साठी घोळक्यांनी फिरत असतात. त्यांना श्री साठी चंदा मागणे म्हणजे मोठ्या उत्साह वाटत असतो. अगदी मन मोकळ्या निस्वार्थ पणाने चंदा जमवण्यासाठी सारेच एकवटतात. प्रत्येक दुकान, हॉटेल ,पानटपरी, शाळा अशा सर्वच ठिकाणी वर्गणी साठी धाव पळ करीत असतात. तर उत्सव पुर्ण होई पर्यत ना घर ना शाळा अशी अवस्था त्यांची बनते.

थोडी फार जागा आणि तसेच लागणारे साहित्य, वस्तू घेण्यासाठी मात्र अगदी नरमाईची भुमिका घेतात आणि प्रशासनाकडून परवानगी घेण्याकरीता प्रेमळ वाणीतुन विनवणी करीत शेवटी परवानगी मिळवितातच, तेव्हा कुठे त्यांचा जीव हा भांड्यात पडतो. अनेक ठिकाणी श्री ची स्थापना मोठ्या आनंदात करतात. अगदी पुजा पाठ या बाबी ही प्रामुख्याने जोपासत हा धार्मिक उत्सव साजरा करतात आणि कसलाच

कुणाला त्रास होणार नाही. याची खबरदारीपण बाळगतात. अश्या प्रकारचे नियोजन करीत गणेशोत्सव साजरा केला जातो.सर्वानी शांततेत गणपती बाप्पा चे विसर्जन करतो असे म्हणत स्मित चेहरा करीत पोलीस उपनिरीक्षक पंतोजी साहेबांना होकार दिला.