बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथे शालेय वयातच विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा.त्याची चिकित्सक वृत्ती वाढावी. जिज्ञासा, एकाग्रता वाढावी.यातून भविष्यातील संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या हेतूने सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्यामार्फत हा प्रकल्प शाळेत यशस्वी राबविण्यात येत असून इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोग करत असून त्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढीस लागत आहे.
नुकतीच विद्यार्थ्यांसाठी शाळेत कार्यशाळा घेण्यात आली. सदर उपक्रमाचे संस्था अध्यक्ष डॉ . श्री सुरेशराव जाधव,उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव, खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव, तसेच सर्व संस्था पदाधिकारी, विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री के. डी. पवार सर, श्री डी.पी.शिंदे सर, श्री एस.आर. पाटील सर,श्री जयंतराव जाधव, प्राचार्य दत्तात्रय गोफणे,श्री मोहनराव गुरव, सौ लाड यांनी कौतुक केले.प्रकल्पाची यशस्वी राबवणूक करण्याकरता सौ स्वाती जाधव, सौ. अमृता जाधव, श्री विक्रम कांबळे, श्री अनिल पाकले,श्री सचिन वायदंडे, श्री महेश चव्हाण, सौ.वसव मॅडम विशेष प्रयत्न करत आहेत.





Social Plugin