Ticker

6/recent/ticker-posts

नगरपंचायत सावली तर्फे घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप



सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली - दिनांक ०१/०९/२०२५ सोमवारी सावली येथील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घराचे १०० टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या ३० घरकुल लाभार्थ्यांना नगरपंचायत सावली तर्फे नगरपंचायत सावलीच्या  नगराध्यक्षा सौ. साधनाताई वाढई आणि मुख्याधिकारी संदीप दोडे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत प्रत्येक गरजू आणि गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा अध्यक्ष लोकलेखा समिती विधानसभा महाराष्ट्र, काँग्रेस गटनेते विधानसभा मा. विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने घरकुल लाभार्थ्यांना टप्याटप्प्याने निधीचे वितरण करण्यात आले, आणि दिनांक २ सप्टेंबर आणि ३ सप्टेंबर ला बाकी लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी सावली नगरपंचायत चे नगरसेवक प्रीतम गेडाम, नगरसेवक सतीश बोम्मावार, सचिन संगिडवार गुणवंत सुरमवार, अंजली देवगडे आदी उपस्थित होते.प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय चेपुरवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोहित शुक्ला इंजिनियर, मृणाल गोलकोंडावार सावली शहर समन्वयक यांचे सहकार्य लाभले.