अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
मराठवाड्याच्या अस्मितेचा,शौर्याचा आणि बलिदानाचा दिवस १७ सप्टेंबर अंबडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.यानिमित्ताने तहसीलदार विजय चव्हाण यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे तिरंगा फडकावून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला मानवंदना देण्यात आली.'भारत माता की जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या विरांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन लोकशाही मूल्यांचे जतन आणि सामाजिक एकोप्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या कार्यक्रमाला अंबड तहसील कर्मचारी,पुरवठा अधिकारी खांडेभराड,नायब तहसीलदार एकनाथ भोजने,मंडळ अधिकारी नरोटे,अंबड तहसील येथील निवडणूक नायब तहसीलदार श्री धर्माधिकारी व संजय गांधी निराधार विभाग श्री झोरे,श्री वानखेडे,श्री कराड ,श्री श्याम भाऊ विभुते व अंबड तहसील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोडके, सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले,पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे,पोलिस उपनिरीक्षक रंजना बांगलाने यांसह अनेक अधिकारी,पोलीस कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे केवळ तहसील कार्यालयातच नव्हे तर संपूर्ण अंबड शहरात देशभक्तीचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.मराठवाडा मुक्तीचा हा उत्सव भविष्यातही असाच प्रेरणा देत राहील..





Social Plugin