राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस पंचायत समिती समोरील एका दिव्यांगांचे कार्यालय टिनपत्राचे कार्यालय होते. नगर परिषदेकडून राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दिव्यांगांचे कार्यालय हटवून थट्टा केल्याचा आरोप अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी केला. मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेमार्फत गाळ्याचे मुल्यांकन होईल, तेव्हा प्रथम प्राधान्याने दुकान गाळे देण्यात येईल, असे आश्वासन तक्रारकर्ते दीपक जाधव यांना लेखी दिले होते.
यानंतर घंटी बाबा संकुल दुकान गाळ्यांचा लिलाव झाला. परंतु, दिव्यांगांच्या मागणीवर कोणताही विचार केला नसल्याने शनिवारी २० सप्टेंबरपासून उपोषण तर बुधवारी २४ सप्टेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा अपंग जनता सामाजिक संघटनाची यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव यांनी दिला आहे.





Social Plugin