शिरुर ग्रामीण प्रतिनिधी – ( शैलेश जाधव)
महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागा तर्फे आयोजित “महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५” चा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत शिरुर तालुक्यातील श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्ट, शिरुर यांना तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा मान प्राप्त झाला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मंडळामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उपक्रम तसेच सामाजिक कार्यांचे नियोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या मंडळाच्या कार्याची पोचपावती म्हणूनच यंदा प्रथम क्रमांकाचे यश मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या यशात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष भाऊ पुजारी, अध्यक्ष अशोक काळे, उत्सव प्रमुख अविनाश जाधव यांच्यासह राकेश परदेशी, ,सिकंदर मण्यार ,रणजित गायकवाड, सचिन पुजारी, रवि गोसावी,शाम परदेशी, शरद परदेशी, प्रसाद लांडे, स्वप्नील चौधरी, राजेंद्र क्षीरसागर, सतीश धुमाळ, प्रणव मुसळे, गणेश खोले,मयुर काळे, वैभव लांडे, निरंजन काळे, राहुल घोडके, तसेच सर्व हिंतचिंतक, वर्गणीदार व सभासदांचा मोलाचा सहभाग राहिला.
शिरुर शहरात सर्वत्र या यशाचे स्वागत होत असून, हलवाई चौक गणेश मंडळ हे इतर मंडळांसाठी एक आदर्श ठरत आहे.





Social Plugin