Ticker

6/recent/ticker-posts

ओ.बी.सी समाजावर गदा आणणाऱ्या त्या प्रतीकात्मक जी आर ची केली होळी



जितेंद्र बहेकार प्रतिनिधी आमगाव.


 सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील गल्ली-गल्लीत फक्त एकच नारा ऐकायला येतो तो म्हणजे जय ओबीसी . याचे मुख्य कारण म्हणजे 2 सप्टेंबरला शासनाच्या वतीने मराठ्यांच्या बाजूने हैदराबाद गॅजेट्स मध्ये असलेल्या नोंदणीच्या आधारावर काढलेला तो जीआर. या ओबीसी विरोधी जीआरच्या निषेधार्थ महाराष्ट्राच्या गावागावातून ओबीसी बांधव आपला निषेध व्यक्त करत आहेत. व या ओबीसी च्या आरक्षणावर गदा आणणाऱ्या बिहारला सरकारने रद्द करावं या उद्देशाने दिनांक 21 9 2025 ला गोंदिया येथे भव्य मोर्चाच्या आयोजन केलेलं आहे, त्या मोर्चात सर्व सकल ओबीसी समाजाने सहभाग घ्यावा व लोकशाहीच्या मार्गाने आपला विरोध दर्शवा या हेतूने साले कशा तालुक्यातील

गांधीटोला येथे भव्य ओबीसी जनजागृती रॅली काढण्यात आली व 21 सप्टेंबर 2025 रोजी गोंदिया येथे होऊ घातलेल्या ओबीसी महामोर्च्यात नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर  महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या ... पहिल्या जी आर मध्ये हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी- मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत...

 व नंतर काही वेळातच दुसऱ्या जी आर मध्ये हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी- मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असे उल्लेख केला.

         या *दोन्ही GR च्या निषेध करून  GR ची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.* यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत माजी पदाधिकारी त्याचबरोबर गावातील सुजाण ज्येष्ठ नागरिक व युवा मंडळी  प्रामुख्याने उपस्थित होते.