Ticker

6/recent/ticker-posts

कार्यकारी अभियंता आनंद पांडे यांना मातृशोक



 राजपाल बनसोड   तालुका प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : यवतमाळ शहरातील अंजनेय नगर आर्णी रोड येथील निवृत्त शिक्षिका गं. भा. प्रभावती रामराव पांडे वय 85 वर्षे यांचे वृद्धापकाळाने काल 8 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता निधन झाले त्यांचे वर यवतमाळ येथील हिंदू स्मशानभूमी मध्ये रात्री साडेआठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्या कार्यकारी अभियंता आनंद पांडे , जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग यवतमाळ यांच्या मातोश्री आहे.                          

त्यांचे पश्चात एक मुलगा,एक मुलगी, सून, जावई,नातवंडे व आप्त परिवार असून मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. गं. भा. प्रभावतीताई पांडे ह्या तुपटाकळी ता. दिग्रस येथील रहिवाशी असून त्यांनी जी. प. प्राथमिक शाळा तुपटाकळी मध्ये 27 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. विविध पदावर आज रोजी गेलेले विद्यार्थी त्यांनी घडविले.