मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
ओ बी सी संघर्ष समिती चे तहसीलदाराना निवेदन
मालेगाव ता 9 - मालेगाव तालुक्यातील ओबीसी संघर्ष समिती च्या वतीने आज ता 9 रोजी तहसीलदाराना निवेदन देऊन ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा ता 2सप्टेंबर रोजीचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की ता 2 सप्टेंबर २०२५ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून शासन निर्णय क्र. सबीसी-२०२५/प्र.क्र.२१९/माक जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा-कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर व असंवैधानिक आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे ४०० हून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असून, त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात होणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे. त्यामुळे हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे
यावेळी उपस्थितना रासप चे जिल्हा अध्यक्ष अजयराव राजुरकर समता परिषदेचे प्रदेश चिटणीस प्रा अरविंद गाभणे , , राजू सांगळे यांनी हा अध्यादेश रद्द करण्याची गरज विषद केली यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष जावेद भवानीवाले , कपिल भालेराव, अजिंक्य मेडशीकर सुनील आडे , ॲड सुभाषराव घुगे, चंद्रकांत गायकवाड, श्री नाथ नंगे महाराज संस्थान चे माजी अध्यक्ष सुरेशराव घुगे गणेश राऊत कैलाश पवार ,ॲड सुभाषराव घुगे विलास काकड ,प्रमोद सांगळे ,विजय घुगे , सुरेश मोतेकर ,भास्करराव घुगे अरुण सांगळे ,कैलाश राठोड ,वसंतराव घुगेडाॅ सुनिल घुगे आदी उपस्थित होते





Social Plugin