*न्यायालयात बाजु ॲड.कृष्णा नंदलाल शर्मा यांनी संस्थांनची विनामूल्य सेवा देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला*
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
जालना जिल्ह्यातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री मत्स्योदरी देवी मंदिरातील दानपेटी फोडून चोरीस गेलेले तब्बल साठ हजार रुपये अखेर मंदिराला परत मिळाले आहेत.विशेष म्हणजे हे प्रकरण न्यायालयात मांडताना ॲड. कृष्णा नंदलाल शर्मा यांनी विनामूल्य सेवा करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
दानपेटी फोडून चोरट्यांनी भक्तांनी देवीच्या चरणी अर्पण केलेले ६०,०००/- रुपये लंपास केले होते. या संदर्भात मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व अंबड पोलिसांनी चोख तपास करून ५ आरोपींना ताब्यात घेतले व चोरीस गेलेले संपूर्ण पैसे जप्त केले.
जप्त पैसे परत मिळवण्यासाठी संस्थानाच्या वतीने अध्यक्ष व मा.तहसीलदार अंबड यांनी ठराव घेऊन व्यवस्थापक कैलास शिंदे यांची निवड केली. त्यानंतर ॲड.कृष्णा शर्मा यांनी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,अंबड न्यायालयात कलम ५०३ बी.एन.एस.एस.नुसार अर्ज दाखल केला.सदर अर्जावर युक्तिवाद होऊन मा.न्यायाधीश श्वेता परिहार यांनी मंदिर संस्थानाच्या बाजूने निर्णय देत पैसे परत करण्याचा आदेश दिला.
नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर मंजूर आदेशाचे पत्र माजी आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते व्यवस्थापक कैलास शिंदे यांना प्रदान करण्यात आले.यावेळी संस्थानाचे कर्मचारी व भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते





Social Plugin