Ticker

6/recent/ticker-posts

इडा पिडा दूर करणारी,श्री रेणुका माता,



 प्रतिनिधी : शिवनाथ घोटकर, दि.30 सप्टेंबर 2025,

भगूर : नवरात्राेत्सवात अनेक स्त्रिया मंदिर परिसरात घटी बसतात. भगूरची श्री रेणुका माता मंदिरातदेखील घटी बसविण्यात येतात. नाशिक जिल्ह्यातील पंचवटी परिसर हा प्राचीन काळात दंडकारण्य म्हणून ओळखला जात हाेता. परंतु ज्यावेळेस १४ वर्ष राम सीता लक्ष्मण वनवासात असताना येथे आले होते. तेव्हा भृगू ऋषी यांचा आश्रम हाेता. अशा या महान ऋषींच्या आश्रमात स्वयंभू मूर्तीची श्री रेणुका माता स्थापना झाली आहे. त्यामुळेच भूगू ऋषींच्या नावाने या शहराचे नाव भगूर असे पडले आहे. त्यामुळे पूर्वीचे लोक याला भगूरची रेणुकादेवी ही म्हणत. 

अष्टभूजा देवीच्या स्वयंभू मूर्तीचे झाले दर्शनराम व लक्ष्मण सीतेमाताच्या शोधासाठी भगूर मार्गे श्री क्षेत्र टाकेदला गेले, त्यावेळी त्यांनी या रेणुका मातेचे दर्शन घेतले होते, अशी पूर्वीपासून अख्यायिका आहे. सदरील मंदिरात दर्शन घेण्याआधी शरीर शुद्धीकरणासाठी मंदिराच्या समोर पुरातन नव्वद पायऱ्यांचा जुनी विहिर(बारव) आहे. पूर्वी सदरील बारवचे प्रवेशदार हे मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत होते. सदरील बारवाचे वैशिष्ट्य असे सांगतात की, सदरील बारवात रेणुका मातेची सोन्याची परात, समइ व भांडे आहेत, असे म्हणतात. ज्यांना त्वचा रोग म्हणजे नायटा, खरुज अािद असेल त्यांनी या बारवात अंघोळ केली तर त्यांचा हा रोग नाहीसा होतो.

सालाबाद प्रमाणे याही वरचे नवरात्र उत्सव जोशात आणि उत्साहात चालू आहे, याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातून अनेक तालुके गावातून छोटे मोठे दुकानदार आपले दुकाने घेऊन या ठिकाणी येत असतात, भक्त भाविक दर्शनाला येतत, पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी, वैद्यकीय प्रशासन, आरोग्य सेवेसाठी, यांचे देखील कॅम्प लागलेले आहेत,