कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना: केंद्रीय प्राथमिक शाळा नेर ता जि जालना येथील केंद्रप्रमुख बाबुराव भासू पवार हे 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त झालेत. श्री वटेश्वर भगवान मंदिर नेर येथे त्यानिमित्ताने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, शिक्षक,विद्यार्थी,नातेवाईक, मित्रमंडळी आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी केंद्रप्रमुख बाबुराव पवार यांचा सपत्नीक सत्कार केंद्र नेरच्या वतीने माननीय माजी आमदार धोंडीरामजी राठोड,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे आणि महंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रस्ताविकात मंगेश जैवाळ यांनी सरांचा शिक्षक ते केंद्रप्रमुख, जालना शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्याध्यक्ष असा सर्व जीवनपट च सांगितला. धोंडीरामजी राठोड यांनी डी. एड.काळापासून ते आजपर्यंत पवार सरांच्या बद्दल कौतुक करून बोलले सरांच्या डी एड काळातील छोट्या मोठ्या गोष्टी सांगून सरांच्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्षीय समारोपात राजेश सुर्वे यांनी पवार सरांच्या संघटनात्मक कार्याचा आलेख मांडला.संघटन कौशल्य हे वाखान्यजोगे असल्याचे सांगितले.सरांनी शिक्षक परिषदेसाठी केलेल्या कार्याचा गौर्वोदगार काढून सरांना दुसऱ्या इनिंगच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे बाबुराव गाडेकर, प्रकाश चतरकर,भरत मडके,उत्तम वायाळ,अरुण जाधव, भगवान जायभाये, विकास पोथरे, मधुकर काकडे,देवेंद्र बारगजे,साधना ताई जैवाळ,शांतीलाल गोरे,जगन्नाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ खेडेकर आणि अप्पासाहेब मुळे यांनी केले. आभार प्रदर्शन विजय पितळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.





Social Plugin