अर्धापूर प्रतिनिधी/विश्वराज वाकोडे
26/09/2025
इस्लापूर केंद्र शासनाचे स्वस्थ नारी सशक्त परिवार यामध्ये महिलांचे सक्षमीकरण,कुटुंबाचे आरोग्य संवर्धन आणि समाजात जागरूकता या उद्देशाने प्रा . आ.केंद्र ईस्लापूर येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख मॅडम व. मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ के पी गायकवाड सर यांच्या मार्गदर्शना खाली वैद्यकीय अधिकारी डॉ .ऋषीकेश निकम सर यांच्या उपस्थित अंगणवाडीतील बालके,किशोरवयीन मुली, पात्र जोडपी,गरोदर माता,स्तनदा माता, वयोवृद्ध महिला,तसेच इतर सर्व महिलांची NCD तपासणी ,BP,Sugar,CA screening,TB Screening, आयुष्मान कार्ड काढणे , पाळीतील स्वच्छता मार्गदर्शन,निरोगी जीवनशैली मार्गदर्शन,आहार मार्गदर्शन,स्थानिक आहाराबद्दल माहिती,लाभार्थीना औषधी वाटप ,दातांची काळजी,डोळ्यांची तपासणी मार्गदर्शन, शिकेल सेल तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी घेण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच श्री नारायण शिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख पाहुणे उपसरपंच श्री दुरपडे पाटील व गावातील ज्येष्ठ नागरिक श्री नारायण दांतलवाड काका , गजानन कदम हे कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्राअंतर्गत PHC ईस्लापूर व सर्व उपकेंद्रातील कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उस्पूर्त प्र
तिसाद दिला.





Social Plugin