अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
वाघलखेडा ते शेवगा हा रस्ता दळणवळनासाठी अत्यंत महत्वाचा रस्ता आहे.समस्त शेतकरी वर्ग यांना शेतात जाण्यासाठी व अंबड येथे ये जा करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. त्यामुळे प्रशासनाने गावचा रस्ता मोकळा करून द्यावा अशी सर्व शेतकरी व गावातील नागरीकाने मागणी केली आहे.
सदरील रस्ता हा मेन हवे जालना ते अंबड पासून ५ किलो मीटर अंतरावर आहे व शेतीचा हा मेन रस्ता असुन सध्या सदरील रस्ता मध्ये पूर्ण पने पाणी साचलेले आहे व महिला शेतकरी बांधव यांना आज शेतात ये जा करण्यासाठी व सोयाबीन काढणी करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही.तरी प्रशासनाने या मागणी कडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा.अन्यथा सर्व शेतकरी बांधव जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसणार आहे.
आज शेतातील कपाशीचे आधीच नुकसान झाले आहे,सोयाबीन पूर्ण पने खराब झालेली आहे जो वाचलेला शेत माल आहे हा जर खराब झाला तर समस्त गावकरी सामूहिकपणे आत्मदहन करण्याची परवानगी मा तहसीलदार यानी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे सर्व शेतकरी बांधवाने केली.
यावेळी रामकिसन घुगे,एकनाथ घुगे,बळीराम नागरे,जनार्धन नागरे,सुरेश घुगे,भानुदास नागरे, जितेंद्र नागरे,श्रीराम नागरे,जनार्धन नागरे,चंद्रकला नागरे,अशोक नागरे,साईनाथ नागरे,रमेश नागरे, वैजिनाथ नागरे,भगवान घुगे,भारत येडे,विठ्ठल मोरे,कडुबा येडे,भागीरथ नागरे,नाथा नागरे,श्रीरंग नागरे,किसन घुगे,जालिंदर दहिफळे,लक्ष्मण येडे,अमोल नांगरे,चंद्रकांत नागरे,अशोक नागरे,वैजिनाथ नागरे,भगवान घुगे,विठ्ठल नागरे, जालींदर दहिफळे,गीताराम मोरे आदी शेतकरी बांधवांच्या सह्य आहेत.





Social Plugin