श्रीमंत बालहौशी गणेश मंडळाची उपक्रमशील परंपरा कायम
कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजा लाड येथील श्रीमंत बालहौशी गणेश मंडळाने दरवर्षी यंदाही आपली उपक्रमशील परंपरा कायम ठेवत विविध कडधान्यापासून पर्यावरणपूरक आकर्षक गणेशमूर्ती साकारून तिची प्रतिष्ठापना केली आहे. ही गणेशमूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधत आहे
स्थानिक भाजीबाजार गणेशोत्सवात परिसरातील श्रीमंत बालहौशी गणेश मंडळ मागील अंदाजे १५ वर्षापासून पर्यावरणपुरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे. विशेष म्हणजे मंडळाचे पदाधिकारी दरवर्षी स्वतःच्या हाताने व कल्पकतेने मूर्ती साकारत असतात. यावर्षी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनात उडीद, मुंग, तूर, चणा, वाटाणा, बटबटी, चणाडाळ, मसूर डाळ अशा १० ते १२ प्रकाराचे धान्य व लाल माती वापरून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली आहे. या मूर्तीची उंची ८ फूट असून, वजन
सुमारे १०० किलो आहे. अवघ्या १८ ते २० किलो धान्यआणिलाल माती वापरून साकारण्यात आलेली ही मूर्ती अवघ्या २०ते २२ हजार रुपयात तयार झाली आहे. जेथे लाखो रुपये खर्च करून मंडळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचीप्रतिष्ठापना करतात तेथे श्रीमंत बालहौशी गणेश मंडळ कडधान्यापासून माफक पैशात गणेशमूर्ती तयार करून तिची स्थापना करून एक नवा आदर्श उभा केला आहे. यापूर्वी या गणेश मंडळाने कवळे, धागा, डायमंड, पेन्सिल, पर्यावरणपूरक कमी खर्चात आकर्षक गणेशमूर्ती साकारून तिची गणेशोत्सवात प्रतिष्ठापना केली





Social Plugin