Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा लाड येथील संत निरंकारी शिबिरात 55 जणांचे रक्तदान



कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे 

चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने  येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केलेसंत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने एकाच दिवशी संपूर्ण भारतभर रक्तदान शिबिर घेण्यात आले. या मानवतेच्या कार्यामध्ये सर्वच जाती-धर्माचे लोक सहभागी झाले. मागील ३८ वर्षांपासून ही मोहिम निरंतर सुरू आहे. ज्यामध्ये आजपर्यंत मिशनने ७४७८ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून त्यामधून

१२.४० लाख सुमारे युनिट्सपेक्षा जास्त रक्त संकलित केले आहे. मिशनच्या वतीने देशभरात आणि विदेशातही रक्तदान शिबिरांचे आयोजन जाते. दरम्यान, कारंजातील रक्तदान शिबिरामध्ये ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली व इतर ठिकाणी होणाऱ्या रक्तदानासाठी आपणही रक्तदान करावे व इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टीने कार्य करावे असे आवाहन केले. शिबिरात शासकीय रक्त केंद्र वाशिमने रक्त संकलन केले.