Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थी बालमित्रांचा बाप्पासाठी आगळा वेगळा उपक्रम..



ठाकरवाडी/प्रतिनिधी प्रकाश परते.


 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी कोहंडी येथील बाल विद्यार्थ्यांनी शाळेतून मिळालेल्या वेळेचा फायदा घेत जवळच असलेल्या साई कन्हैया गणेशोत्सव मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या गणरायाच्या जवळील परिसरातील केरकचरा साफ करून तसेच आजूबाजू रस्त्यालगत लावलेल्या झाडांची निगा राखत स्वच्छतेचा संदेश दिला.

         यावेळी जिल्हा परिषद शाळेचे उपमुख्याध्यापक श्री घिगे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियानास मार्गदर्शन केले .तर बाल मित्रांनी गणराया बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत बापाची वेगवेगळी गीते गाऊन आनंद व्यक्त केला व बापाचा गोड प्रसाद घेऊन परत आपल्या शाळेत वेळेवर उपस्थित राहिले.

     याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थ युवराज हिंदोळे, भास्कर उघडे, जयराम वाघ, सुनील मधे, युवराज गिरे, सागर हिंदोळे, विजय उघडे, रामा गिरे, सचिन मेंगाळ, शरद वाघ, रोहिदास मेंगाळ, सुरेश वाघ आदीसह अनेक ग्रामस्थांनी बाल विद्यार्थ्यांचे स्वागत करून कौतुक केले.