Ticker

6/recent/ticker-posts

घुंगर्डे हादगाव येथील गल्हाटी नदीला पूर;गावात शिरले पुराचे पाणी,नागरिकांची धावपळ



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गल्हाटी नदीला मोठा पूर आला.या पुराचे पाणी थेट गावात शिरल्याने एकच धावपळ उडाली. गावातील अनेक दुकाने आणि हॉटेल्समध्ये पाणी शिरले असून,यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

पुराची वाढती पातळी लक्षात घेता,जिल्हा परिषद शाळा आणि मत्स्योदरी विद्यालय यांना आज सुट्टी देण्यात आली आहे.यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळता आली.

गावाचे सरपंच वंदना काळे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.त्यांनी सांगितले की,"पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे कोणीही नदीपात्रात किंवा पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये.सर्वांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी."