Ticker

6/recent/ticker-posts

येरगी येथील गणेश मंडळाला पोलिस अधीक्षकांकडून पारितोषिक



देगलूर : नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार (IPS) यांच्या कडून नांदेड जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम व डि.जे. मुक्त गणेश उत्सव राबविले असता नांदेड जिल्ह्यामधील देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक नगरी येरगी येथील गणेश मंडळाला पुरस्कार देण्यात आला. सदरील गणेश मंडळ यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CC TV बसविले होते. तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले होते. 

गणेशोत्सव दरम्यान सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करून त्या विविध स्पर्धेचे बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. त्या बद्दल येरगी येथील गणेश मंडळाला विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नांदेड पोलिस दलाच्या वतीने सदरील गणेश मंडळाला सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक अबीनाश कुमार सर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, देगलूर स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती मुंढे, मरखेल स्टेशनचे पोलिस निरीक्षक आर.एम.हुंडेकर, लोखंडे सर, येरगीचे सरपंच संतोष पाटील येरगीकर, मा. तंटामुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन देसाई, इरवंत काळीगवार, विश्वनाथ भोकसखेडे, सचिन चैडके, गजानन चैडके, मंडळ अध्यक्ष श्रीकांत बरगले, कोषाध्यक्ष संगमनाथ बागेवार, विनायक गादगे, आदी उपस्थित होते.