*पोराले माह्या गुरूजी
*शिक्षण असं देजा
*माणूस झाला पाहिजे पोरगा
*काळजी जराशी घेजा
*विज्ञान असं शिकवा त्याले
*अज्ञान गेलं पहिजे
*सदेह वैकुंठगमन कथा
*त्यानं नाकारायला पाहिजे
*इतिहासातून त्यानं
*घेतला पाहिजे बोध
*शिवरायांच्या मृत्युचा
*लावला पाहिजे शोध
*सुर्य, चंद्र, तारे
*ग्रहणही दाखवा नीट
*शनिमंगळ नसतो लागत
*बसवा त्याच्या डोक्यात फिट
*आकड़े मोड भुमिती
*करणं शिकवा पटीत
*आयुष्याचं विज्ञानातून
*मांडलं पाहिजे गणित
*ऑनलाइन राहू द्या
*ऑफलाईनच शिकवजा
*शाहू फुले आंबेडकरांचं
*कर्तृत्व त्याले दाखवजा
*नागरिक शास्त्र शिकवताना
*नजरेपुढं ठेवजा संविधानाले
*धर्माआधी असतो माणूस
*समजलं पाहिजे पोराले
श्री रामेश्वर तोंडे (कलाशिक्षक)
जि. प. हायस्कूल, मंगरूळ नवघरे
ता. चिखली. जि. बुलडाणा





Social Plugin