Ticker

6/recent/ticker-posts

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 कटगुण ता . खटाव येथे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चारीत्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी गज मारून खून केल्याची घटना घडली आहे . याबाबत पुसेगाव पोलीसांनी पतीला अटक केली आहे .         

 याबाबत अधिक माहिती , कटगुण ता. खटाव जि. सातारा येथील  विनोद विजय जाधव वय २६ वर्षे, हा आज  दुपारी १.०० वाजणेचे सुमारास स्वतःहून पुसेगाव पोलीस ठाणेत हजर राहून त्याने सांगितले की, मी काही वेळापुर्वी माझी पत्नी पिंकी विनोद जाधव वय २१ वर्षे, रा. कटगुण गोसावीवस्ती ता. खटाव हिचा चारित्र्याच्या संशयावरुन मी तिचे डोक्यात लोखंडी गज (रॉड) मारला असून ती माझे राहते घराजवळ डोकीत दुखापत झाल्याने रक्ताचे थारोळ्यात पडली आहे असे कळविल्याने सदर ठिकाणी स.पो.नि.श्री. संदीप पोमण व पुसेगाव पोलीस ठाणेकडील स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला असता पोलीसांना सौ. पिंकी विनोद जाधव हिचे डोक्यात लोखंडी गजाने (रॉडने) मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत होवून डोक्यातून खुप प्रमाणात रक्तस्त्राव होवून ती रक्ताचे थारोळ्यात पडलेली दिसलेने तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित असलेले तिचे नातेवाईक यांचे मदतीने तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव या ठिकाणी आणले, परंतू ती उपचारापुर्वीच मयत झाली असलेबाबत डॉक्टरांनी सांगितले . विनोद विजय जाधव याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिचे डोक्यात लोखंडी गज (रॉड) ने मारुन तिला गंभीर जखमी करुन तिचा निघृणपणे खून करुन खुन केल्याची 'खबर देण्यासाठी स्वतःहून पुसेगाव पोलीस स्टेशनला हजर राहिला असून मयत पिंकी विनोद जाधव हिस चिमुकली तीन मुले असून सदर घटनेमुळे कटगुण व पुसेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेबाबत पुसेगाव पोलीस स्टेशनला आरोपी पती विनोद विजय जाधव याचेविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्यास पुसेगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.


 पोलीस अधीक्षक तुषार दोशी , अप्पर पोलीस अधिक्षक  श्रीमती वैशाली कडूकर ,  उपविभागिय पोलीस अधिकारी अजित टिके   यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पोमण हे सदर खुनाच्या गुन्हयाचा तपास करीत आहेत. सदर खुनाचे घटनेबाबत स.पो.नि.संदीप पोमण  व पुसेगाव पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी सौ. पिंकी विनोद जाधव हिला तिच्या नातेवाईंकांच्या मदतीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव येथे दाखल केले परंतू ती उपचाराचे पुर्वीच मयत झाली असलेबाबत डॉक्टरांनी सांगितले आहे.

 2 Attachments

  •  Scanned by Gmail