Ticker

6/recent/ticker-posts

चिखली तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदी खंडाळा म येथिल उपसरपंच शेख जावेद शेख गुलाब यांची नियुक्ती



मन्सूर शहा. धोत्रा. भनगोजी :--

चिखलीः - चिखली तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी खंडाळा म येथिल उपसरपंच शेख जावेद शेख गुलाब यांची नियुक्ती *करण्यात आली आहे. चिखली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास वाघमारे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली.

उपसरपंच शेख जावेद शेख गुलाब यांची निवड पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना एकत्र करून काँग्रेस विचार जनतेपर्यंत पोहोच विण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे वाघमारे यांनी सांगितले. या नियुक्तीपत्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी, पं. नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रेरित राहून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पक्षाचा प्रसार-प्रचार वाढविण्याची जबाबदारी शेख जावेद यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

शेख जावेद यांनी या अगोदर पण युवक काँग्रेस ब्रिगेड असेल, सोशल मीडिया असेल, काँग्रेस सेवा फ़ाउंडेशन असेल अशा सेल मध्ये काम करुण कॉंग्रेसला मजबूत करण्याचे काम नेहमी केले आहे आणि इथून पूढ़े ही करतील. अ.भा. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, खा. मुकूल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अनिकेत मापारी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून संघटन अधिक बळकट करण्याची ग्वाही दिली. सदर नियुक्तीपत्र प्रभारी राजेंद्र राख साहेब व माजी आमदार राहुल बोंद्रे, अंबादास वाघमारे यांच्या हस्ते दिले. यावेळी राहुल सवडतकर, डॉ. इसरार,  डॉ सत्येंद्र भुसारी, सचिन भाऊ बोन्द्रे सुनील ठेंग, गणेश ठेंग, इसूफ शहा, कृष्णा सपकाल उपस्थित होते. या निवडीने शेख जावेद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.