मन्सूर शहा. धोत्रा. भनगोजी.:---
चिखली शहरासह तालुक्यातील शिवभक्तांसाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ठरला. दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा येथे उभारण्यात येणार असून, त्याच्या पायाभरणी समारंभाचा सोहळा आज (दि.२५) मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. या समारंभाचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते झाले. या भव्य कार्याचे आयोजन शिवस्मारक समितीने केले होते. शहरभरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जयजयकारांनी वातावरण दुमदुमवून टाकले.





Social Plugin