Ticker

6/recent/ticker-posts

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - जावेद अहेमद



              *शासनाने तात्काळ मदत करण्याची ईमेल द्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन*

देगलूर- प्रतिनिधी

 मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ टाकला असून नागरिकांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक अनेक भागात शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे.यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मुखेड तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकर्‍याचे पिकाचे नुकसान झाले आहेत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे गावचे हजारो हेक्टर जमीन पुरातच बुडुन असल्यामुळे शेतकरी बांधवावर आस्मांनी संकटता सापडल्यामुळे अश्या शेतकर्‍याना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद अहमद यानी इमेल द्वारे मुख्यमंञी साहेबांनकडे केली आहे. या आसमानी संकटामुळे अनेक शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. गुरे ढोरे व माणसाचा देखील यामध्ये जीव गेले आहेत. शासनाने केलेली आर्थिक मदत ही तुटपुंजी स्वरूपाची आहे.