बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची २३४ व्या निमित्त भिवडी(तालुका पुरंदर) जिल्हा पुणे या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात बेळगाव येथे होणाऱ्या नॅशनल स्तर कुस्तीसाठी निवड झाल्याबद्दल डिस्कळ तालुका खटाव येथील पै. महाराष्ट्र चॅम्पियन वैभवी विक्रांत मदने हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते पदक देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख उपस्थिती मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले,माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर ,आ. गोपीचंद पडळकर, आ.सचिन पाटील, आ.राहुल कुल ,आ.विजय बापू शिवतारे,आ.संजयजी जगताप,दौलत नाना शितोळे ,मोहनराव मदने ,रोहिदास मदने आदींची होती. डिस्कळ तालीम संघ चे अध्यक्ष पै. विक्रांत मदने यांची कन्या महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान वैभवी विक्रांत मदने वयाच्या ११व्यां वर्षी तिने अनेक कुस्ती मैदानं गाजवून कुस्ती खेळात डिस्कळ चे नाव उंचावलेच आहे .
पै. वैभवी विक्रांत मदने हिने १४ वर्षे खालील वयोगटातील कुस्तीमध्ये सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती खटाव वडूज शिक्षण विभागाचे वतीने घेण्यात आलेल्या खाशाबा जाधव तालुका स्तरीयआणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक , जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा आयोजित करण्यात आलेले खटाव माण केसरी कुस्ती स्पर्धेत प्रथम ,कराड येथे लोकमत कॅम्पस क्लब कराड यांचे वतीने आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आणि मिशन ऑलंपिक राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी स्पर्धेत प्रथम क्रमांक. मिळवला आहे.तिला घरातूनच कुस्तीचा वारसा प्राप्त झाला आहे. तिचे पणजोबा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. पै. शंकरराव मदने (आण्णा) ,आजोबा पै.श्री भिमराव मदने, आणि वडील पै. विक्रांत भिमराव मदने डिस्कळ तालीम संघ अध्यक्ष यांच्या प्रेरणेतून ही कुस्ती परंपरा जोपासत पै. वैभवी मदने आज लहान वयात अनेक मैदाने गाजवत आहे.या कुस्ती खेळाडुस प्रोत्साहन देण्यासाठी डिस्कळचे. पैलवान मोहनराव निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
:कुस्ती हा भारतात अत्यंत प्राचीन आणि लोकप्रिय व पारंपारिक खेळ आहे. ग्रामीण भागात कुस्तीला सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. याच कुस्तीची परंपरा डिस्कळ तालुका खटाव येथील मदने कुटुंबातील चौथ्या पिढीकडून आजही जोपासली जात.





Social Plugin