कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
सायबर गुन्हे शाखेची कारवाई, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता कारंजा (लाड) येथील प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका, आशा राऊत यांना वेस्ट बंगाल पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि सायबर गुन्ह्यांचा संशय आहे. प्राथमिक तपासात, राऊत यांच्या स्वतःच्या बँक खात्यातून काही संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळले आहे. त्यांच्या खालसायबर गुन्हे शाखेची कारवाई, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता कारंजा तालुक्यातील प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका, आशा राऊत यांना वेस्ट बंगाल पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि सायबर गुन्ह्यांचा संशय आहे. प्राथमिक तपासात, राऊत यांच्या स्वतःच्या बँक खात्यातून काही संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळले आहे. त्यांच्या खात्यात जमा झालेली मोठी रक्कम गैरमागनि मिळवलेली असावी असा पोलिसांना संशय आहे. सूत्रांनुसार, ही रक्कम इतर खातेदारांच्या पैशांवरून किंवा बनावट व्यवहारांतून जमा झाल्याची शक्यता आहे.
तपास सुरु, मोठे घोटाळे उघड होण्याची शक्यता पोलिसांचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे गैरव्यवहार किंवा घोटाळे उघड होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस अधिक सावधगिरीने तपास करत आहेत. यात आणखी काही अधिकारी किंवा कर्मचारी सामील आहेत का याचाही शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.





Social Plugin