आरिफ खान पठाण मेळघाट, धारणी
मेळघाट धरणी .भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मेळघाट विधानसभा पक्षप्रमुख श्री. राजकुमार पटेल यांनी आज मेळघाट भागातील धारणी तहसीलमधील अनेक गावांना भेट दिली. त्यांनी असंख्य शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुसळधार पावसामुळे त्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शेतांना भेट दिली. बहुतेक सोयाबीन, मका आणि कापसाचे पीक नष्ट झाले आहे आणि मेळघाटचे शेतकरी आता सरकारकडे मदतीसाठी आवाहन करत आहेत. ही बाब गांभीर्याने घेत, काँग्रेस पक्षाने मेळघाट विधानसभा पक्ष प्रमुख राजकुमार पटेल यांनी धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांना यांना निवेदन सादर केले आणि मेळघाट प्रदेशाला ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली. मागणी लवकर पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाने दिला.
मेलघाट परिसरास तात्काळ अतिवृष्टीग्रस्त घोषित करावे.
1. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई व कर्जमाफी जाहीर करून आर्थिक मदत पोहोचवावी.
2. पिकांचे पंचनामे जलदगतीने करून पीडित शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला द्यावा.
3. पिण्याच्या पाण्याची, आरोग्याची व जनावरांच्या चाऱ्याची सोय युद्धपातळीवर करावी





Social Plugin