Ticker

6/recent/ticker-posts

गणेशोत्सव २०२५ : शिरुर वाहतूक पोलिसांचा मातोश्री प्रतिष्ठानतर्फे सन्मान





शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - ( शैलेश जाधव )

शिरुर शहरात गणेशोत्सव २०२५ च्या पहिल्या दिवशी गणराया स्थापनेदरम्यान रयत शाळा मैदान परिसरात मोठी गर्दी अपेक्षित होती. मात्र शिरुर वाहतूक पोलिसांनी अगदी चोख बंदोबस्त आणि नियोजन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश मिळवले.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे साहेब आणि सर्व वाहतूक पोलीस कर्मचारी यांचा विशेष सन्मान मातोश्री प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला.

या कार्यक्रमाला मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत आंबेकर, पत्रकार सतिश धुमाळ, पत्रकार प्रविण गायकवाड, पत्रकार मुकुंद ढोबळे, पत्रकार फिरोज सिकलकर, सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष शैलेश जाधव आणि ॲड. विषाल वीर उपस्थित होते.यावेळी बोलताना अभिजीत आंबेकर यांनी वाहतूक पोलिस प्रशासनाच्या कामाचा लेखाजोखा मांडत त्यांच्या उत्तम नियोजन व कामगिरीची विशेष प्रशंसा केली.