राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : सोमवारी सकाळी नवीन बस स्थानक परिसरात हजारो बांधव एकत्र जमले. वसंतरावजी नाईक व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आणि जय सेवालाल चा गजर करून मोर्चाला शांततेत सुरुवात करण्यात आली. हैद्राबाद गॅझेट नुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येथेही हजारो बंजारा बांधवांनी आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले. दिग्रस तालुक्यातील वाशिम सह विदर्भातून हजारो महिलांसह बंजारा बांधव हजारोच्या संख्येने तहसील कार्यालयावर धडकले अनेकांनी घोषणाबाजी देत "एकच नारा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं" व जय सेवालाल.! च्या गजराने तहसील परिसर दुमदुमून टाकला. शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक लाठी वाला पेट्रोल पंप ते तहसील कार्यालय येथे शांतता प्रिय मार्गाने मोर्चा काढण्यात आला होता. तहसील कार्यालयावर येऊन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना बंजारा बांधवांनी निवेदन देण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चा मध्ये बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशभूतीतील महिला,पुरुष,युवक,युवती नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





Social Plugin