अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड - घनसावंगी तालुक्यात महसुल विभागात चाळीस टक्के जागा रिक्त असल्यामुळे व काही लोकावर प्रशासकीय कार्यवाही झाल्यामुळे पचंनाम्यासह सर्वच कामे खोळंबली असुन या रिक्त जागा भराव्यात यासाठी महसुल मंत्री चद्रशेखर बावनकुळे व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या कडे मागणी केली असल्याची माहिती जिल्हा ग्राहक सरंक्षण परीषद चे अशासकीय सदस्य डॉ रमेश तारगे यांनी दिली आहे.
मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की अंबड घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे व त्या शासकीय कामासाठी पंचनामा करण्यासाठी शासन स्तरावर घनसावंगी तालुक्यात चाळीस टक्के तहसील कार्यालयात स्टॉप कमी आहे व पुरवठा विभागात सुद्धा अशीच परिस्थिती आहे अबंड तहसील कार्यालयात सुद्धा काही पदे रिक्त आहेत.
पुरवठा विभाग मात्र एकाच नायब तहसिलदार याच्यावर अवलंबून आहे अबंड चे तहसिलदार यांचे कामाचा ऊरक चांगला असल्यामुळें मोठ्या प्रमाणावर कामे होत आहेत मात्र फिल्ड वर काम करण्यासाठी तलाठ्याची संख्या कमी आहे. त्यामुळे पचंनामे करण्यासाठी विलबं होण्याची शक्यता नाकारता येत नाही शासनस्तरावर दिवाळी पुर्वी अनुदान वाटप करायचे असेल तर तात्काळ दोन्ही तालुक्यात रिक्त पदे भरावीत अशाप्रकारे निवेदन दोन्ही मत्रीमहोदयाना देण्यात आले असल्याची माहिती डॉ रमेश तारगे यानीं दिली





Social Plugin