संतोष चमकुरे (धावरी) लोहा
समाजात अनेक उपेक्षित, वंचित,गरजवंत आहेत सामाजिक बांधिलकीची जोपासना करण्यासाठी अनेक मार्गही आहेत देहदान , नेत्रदान, अवयव दान, रक्तदान, अन्नदान, त्याचबरोबर शैक्षणिक साहित्याचे दान, अर्थीक मदत, असे प्रत्येकाने काहितरी सामाजिक कार्य करणं आवश्यक असतं आणि ते करायला पाहिजे असं मत सामाजिक बांधिलकीची जोपासना करणारे , धोंडिबा चमकुरे यांनी मत व्यक्त केले....
धोंडिबा चमकुरे यांचा सामाजिक कार्यात रक्तदान करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे, एक दोन वेळा नव्हे तर तब्बल तीस वेळेपेक्षाही अधिक रक्तदान करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे हे महारेकाॉर्ड महापुरुषांच्या जयंतीनिमित्त, पुण्यतिथी निमित्त व वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम,जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय, गावपातळीपासून जिल्हा पातळीवरपर्यत स्वयंस्फुर्तीने त्यांनी रक्तदान करून समाजासमोर नवा आदर्शच घालून दिला आहे आजघडीला त्यांच्याकडे तीस प्रमाणपत्र उपलब्ध आहेत अनेक नांदेड जिल्ह्य रुग्णालयाने त्यांना एक ओळखपत्र दिले त्याआधारे त्यांनी अनेक गरजुंना मोफत ब्लडबॅंकेतून विनामूल्य रक्त उपलब्ध करून दिले..
यापुढे मी रक्तदान करीत राहीन रक्तदान शिवाय अवयव दान नेत्रदान, या उपक्रमांतर्गत सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती करीन ....यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना उभारी मिळावी म्हणून शासनाने, सामाजिक संस्थाने अर्थीक व सर्वोतोपरी मदत करावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले कुणीही सत्कार करण्यासाठी शाल, श्रीफळ, भेटवस्तूआणू नये, केवळ शुभेच्छा द्या असे म्हणाले आज रोजी दि ,4/9/2025 वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. असे हे असाधारण सामाजिक कार्यकर्ते धोंडिबा चमकुरे आणि सामाजिक कार्यात त्यांचे अमूल्य असे योगदान.... आधुनिक रक्तदाते म्हणून वाढती ओळख व
त्यांच्या या साधीराहणी आणि उच्च विचारसरणी असलेले धोंडिबा चमकुरे यांचे लोहा पंचक्रोशीत, कौतुकास्पद कामगिरीचा चर्चेचा विषय ठरला आहे.





Social Plugin