अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
घनसावंगी येथील गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घनसावंगी येथील तलावफुटल्यामुळे शेतीचे १००% नुकसान झाले असून,यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.या संदर्भात आज घनसावंगी येथील खान मुजाहिद खुर्शीद अली व इतर अनेक ग्रामस्थांनी नायब तहसीलदार मोनाली सोनवणे यांना निवेदन सादर करून शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे घनसावंगी गावातील तलावातील पाणीपातळी वाढली.यामुळे तलाव फुटुन शेती पूर्णपणे वाहून गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या नुकसानीमुळे शेतीत गुंतवणूक केलेले शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.शासनाने त्वरित या नुकसानीची पाहणी करून योग्य ती मदत जाहीर करावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासोबतच निवेदनकर्त्यांनी घनसावंगी तालुक्यातील ०४ मंडळ वगळले आहे त्याचा समावेश अतिवृष्टी मध्ये करण्याची विनंती केली आहे,जेणेकरून पुढील मदतकार्यात कोणतीही अडचण येणार नाही.या निवेदनावर नगरसेवक पाडुंरग साळवे,सचिन देशमुख,बापु साहेब कथले,अयुबखान पठाण आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत...





Social Plugin