भगवान ढगे अंतरगाव प्रतिनिधी
दि.२२/०९/२०२५ नऊ रंगाच्या नऊ साड्या माझ्या आईला कधी भेटल्याच नाहीत, नऊ दिवसाचे कडक उपवास करून पण देव तिला कधी पावलाच नाही, तरी माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू कायम तसचं असत, फाटक्या संसाराची ठिगळं जोडता जोडता तिचे काळे केस कधी पांढरे झाले हे तिलाच कळले नाही, आयुष्यात खूप दुखाची वादळे तिने एकटीने झेलली पण माझी ही खंबीर आई कधी कुणापुढं झुकली नाही व रडली तर अजिबात नाही, म्हणूनच मला माझी आई देवापेक्षा कधी कमी वाटलीच नाही.....
नवरात्रीत नऊ देवी बद्दल सगळे काही न काही लिहितात पण जिणे मला जन्म दिला, चांगले संस्कार केले, माझ्या आयुष्यात सुंदर रंग भरले आदिशक्तीचं पर्व म्हणजे स्त्री शक्तीला आवाहन करण्याचं पर्व... पण दुसरीकडे महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटना हा विरोधाभास असला तरी 'ती' ला 'ती' च्यातील स्वाभिमानाची, सबलतेची आणि सक्षमतेची जाणीव होण्यासाठी सरकार, समाजजीवन आणि नातेसंबंध अशा सर्वच पातळीवर प्रयत्न करायला हवेत. म्हणूनच घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आपल्या माय-भगिनींना सुरक्षा, सन्मान आणि संधी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करूया. सर्वांना 'घटस्थापना' व आजपासून सुरु होणाऱ्या 'शारदीय नवरात्रोत्सवा'च्या मंगलमय शुभेच्छा !





Social Plugin