Ticker

6/recent/ticker-posts

देवठाणा रेल्वे स्टेशन परिसरात घाणीचे साम्राज्य जाण्यासाठी रस्ता नाही.



प्रतिनिधी दत्ता बाळापुरकर सोमठाणा.           

      देवठाणा रेल्वे स्टेशन ही एक होल्ट स्टेशन असून इथून दररोज रेल्वेने प्रवासी येजा करतात व त्यांना घाण रस्त्याचा सामना करावा लागतो तरी रेल्वे प्रशासन रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देत नाही या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्ता नसल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी साचून असल्यामुळे स्टेशन कडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही ज्येष्ठ नागरिक यांना जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन रस्त्याची पूर्तता करावी अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे