अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
झिरपी फाट्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत शासकीय राशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना एक पिकअप वाहन पकडण्यात आले.या कारवाईत तब्बल ७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजता झिरपी फाट्यावर ही कारवाई करण्यात आली.एमएच ०३ सीपी ९८१६ क्रमांकाच्या महिंद्रा पिकअपची तपासणी केली असता वाहनातून ४५ पोती तांदूळ (अंदाजे २३ क्विंटल किंमत सुमारे ०१ लाख रुपये)आढळून आले.हे सर्व पोते शासकीय गोणीत भरलेले होते.त्याचबरोबर पिकअप वाहनाची किंमत अंदाजे ०६ लाख रुपये असून,एकूण ०७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाहनचालकाचे नाव रोहीत हरीचंद भवर (रा.टिळक मोहल्ला,अंबड) असे असून चौकशीत हा तांदूळ नारायण वाघमारे (रा.अंबड) याचा असल्याचे त्याने सांगितले.हा तांदूळ गेवराई येथे नेण्याच्या सूचना मिळाल्याचेही त्याने कबूल केले.
या प्रकरणी रोहीत भवर व नारायण वाघमारे यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रंजना संदीपान बागलाने करत आहेत.





Social Plugin