Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थीनींना मोफत सायकलींचे वाटप




बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

डिस्कळ ता. खटाव येथील सुपुत्र श्री सोमनाथ गौतम माने यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थीनींना मोफत सायकलींचे वाटप करून समाजासमोर दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. विद्यालयातील होतकरु व गरजू विद्यार्थिनींना मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अविनाश जंगम यांनी केले .याप्रसंगी सौ अश्विनी माने, आनंदराव निकम, भीमराव माने, पोलीस पाटील गणेश शिपटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री अविनाश जंगम म्हणाले , आदरणीय सोमनाथ माने हे पुणे येथील एका जर्मन कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मॅकॅनिकल इंजिनिअर असलेल्या श्री माने यांनी गेल्या दहा वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकूण 15 सायकलींचे वाटप करण्यात आले. मोफत सायकल मिळाल्याने  विद्यार्थिनींचे चेहरे आनंदाने हरखुन गेले.

श्री माने म्हणाले, कंपनीतर्फे मला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून तसेच सहकारी मित्रांच्या आर्थिक योगदानातून सायकलीसाठी विनियोग करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे प्रयत्न कौतुकास्पद आहे . लहानपणी पितृछत्र हरपल्यानंतर आईची शिस्त व संस्कारांच्या शिदोरीवर माझी जडणघडण झाली असून सामाजिक कार्यात कुटुंबासह पत्नी सौ.अश्विनी ची खंबीर साथ मिळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फारश्या

शैक्षणिक सोयी सुविधा नसतानाही  विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. आगामी काळात शाळेसाठी प्रोजेक्टर व संगणक देण्याचा मानस असल्याचे श्री सोमनाथ माने यांनी यावेळी सांगितले.*महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीगीर वैभवी विक्रांत मदने हीचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास मुख्याध्यापक आर.एम. डांगे, ज्येष्ठ उपशिक्षक सुनील वायदंडे , विलास काटकर, सौ संगीता कर्णे , पुरुषोत्तम सावंत, दत्तात्रय चव्हाण, सौ माधवी गोडसे, सौ वैशाली फडतरे , श्री बलराम घोरपडे, श्रीमती संगीता जाधव , अशोक माने, संताजी जाधव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते श्री विलास काटकर यांनी आभार मानले .