बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
विद्यार्थ्यांना शालेय वयात लाभणारे शिक्षक बहुआयामी व उपक्रमशील असल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर होतो. अशा गुरुजनांचे विद्यार्थी कायम सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहतात. अत्यंत उत्साही,चैतन्यदायी व अडथळ्यावर मात करत या संस्थेतील शिक्षकांनी संस्था स्थापनेपासून ते आज अखेर केलेले शैक्षणिक कार्य सर्वांना अभिमानास्पद आहे. या संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या योगदानातून संस्थेच्या विविध शाखातून हजारो विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत. संस्थेच्या वतीने अशा निवृत्त गुरुजनांचा सत्कार करणे म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या कामाची ओळख नव्या पिढीस करून देणे होय. सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्राबरोबर समाजाशी एकरूप असणारे गुरुजन सर्वांच्या कायम स्मरणात राहतात. असे विचार संस्था अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव यांनी
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव आयोजित संस्थेतील आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सन्मान सोहळ्यात व्यक्त केले. कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक श्री सुभाषराव जाधव, श्री योगेशराव देशमुख,श्री एस.आर.पाटील, श्री विजयसिंह जाधव, श्री जयंतराव जाधव,श्री के.डी. पवार सर, श्री डी.पी.शिंदे सर उपस्थित होते.संस्था उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव व सचिव श्री मोहनराव जाधव यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी प्राचार्य श्री मधुकर कोथमीरे लिखित "वारी श्री सेवागिरींची ,वाट पंढरीची " या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.श्री योगेशराव देशमुख साहेब यांनी प्रास्ताविक केले.श्री. के. डी. पवार, प्रा.जे.बी. जाधव. श्री. आर. एन. जाधव,श्री हरिभाऊ माळी, श्री. ए. डी.जाधव,श्री शरद पंडित,सौ हेमलता फडतरे,श्रीमती सुनिता जगदाळे, श्री मधुकर कोथमिरे, इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी संस्थेच्या वतीने सन 1964 ते आज अखेर या संस्थेत सेवा बजावलेल्या आजी-माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास विविध शाखांचे मुख्याध्यापक सहकारी, आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री एस. आर. पाटील सर यांनी आभार मानले.सौ आरती माळी, सौ संगीता घाडगे, सौ. स्वाती बर्गे, श्री मोमीन यांनी सूत्रसंचालन केले.





Social Plugin