Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय मंत्री मा.खासदार प्रतापराव जाधव पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी



 शेतकरी हवालदिल  सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटण्याची वेळ; शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी 

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेड राजा- मतदारसंघातील सोनोशी, वर्दडी, चांगेफळ, देवखेड, रुह्मणा या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना नेते तथा केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. तसेच प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करतो, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके उध्वस्त झाली असून घरे, रस्ते व इतर पायाभूत सुविधांनाही फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रभावित भागाची पाहणी केली.

पाहणीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी शासनाकडे तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पंचनामे जलदगतीने करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.स्थानिक नागरिकांनीही या वेळी आपले प्रश्न मांडले. रस्ते, वीजपुरवठा व पिण्याच्या पाण्याच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी माजी आमदार डॉ. शशिकांतजी खेडेकर, तोतारामजी कायंदे, शिवसेना नेते गजेंद्र देशमुख, देवखेडचे सरपंच संजय आढाव, चांगेफळचे सरपंच इंद्रजित मोगल, माजी सरपंच जनार्धन मोगल, शिवराज कायंदे, शिवा मोगल, विभाग प्रमुख धनंजय देशमुख, रमेश देशमुख, दत्ता साळुंके, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, नायब तहसीलदार डॉ. प्रवीण वराडे, गट विकास अधिकारी भास्कर घुगे, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र लांडगे, पांडुरंग जायभाये, अशोक मोगल, शरद कुडे, शेख समद, अबु पवार, अनंथा जाधव, युवासेना महायुतीचे पदाधिकारी, महसूल, कृषी अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.