सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण; त्या नऊ दिवसांत 'नो डॉल्बी' अन्यथा कारवाई !
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशोत्सव अत्यंत सुरळीत पार पडला. घरातील आजारी रुग्ण, म्हातारी माणसं, गरोदर महिला, आबालवृद्ध यांच्यासाठी आगामी नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने पुसेगाव, ता. खटाव येथील पोलिस ठाण्यात नवरात्र मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते यांची बैठक पोलीस स्टेशन हॉल येथे घेण्यात आली. नवरात्रौत्सव डॉल्बी मुक्त व पारंपरिक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन करून त्या नऊ दिवसांत, मिरवणुकीतही 'नो डॉल्बी' अन्यथा कारवाईचा इशारा सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिला.
यावेळी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे १५ नवरात्र मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत मार्गदर्शन करताना पोमण म्हणाले, देवीमूर्ती आगमनावेळी तसेच विसर्जनावेळी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा,डॉल्बी/डीजे, लेझर लाईटचा वापर कुणीही करावयाचा नाही अन्यथा कारवाई होणारच. नवरात्र मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे मंडळाची नोंद करून परवाने घेणे बंधनकारक आहे. देशभक्तीपर, सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक तसेच ऐक्य, सलोखा वाढीस लागेल असे देखावे उभारावेत आक्षेपार्ह देखावे उभे करू नयेत.
नवरात्र उत्सव काळात मूर्तीची काळजी मंडळातील प्रत्येकाने घ्यावी. कोणावरही दबाव न आणता जमा केलेल्या वर्गणीचा विनियोग चांगल्या पद्धतीने करावा.
नवरात्रौत्सव दरम्यान कोणतेही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर्स लावले जाणार नाही याची दक्षता मंडळानी घ्यावी. कोणीही अफवा पसरवू नयेत किंवा त्यावर विश्वास ठेवू नये. दुगदिवी विसर्जन मिरवणूक ठरवून दिलेल्या वेळेतच व ठरवून दिलेल्या मागनि काढावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी केले. चौकट- पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशोत्सव काळात पुसेगाव हद्दीतील सर्वच गावांमध्ये डॉल्बीच्या ऐवजी पारंपारिक वाद्याचा वापर करत, वेळेत विसर्जन मिरवणूक काढून नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल जिल्हा पोलिसांच्यावतीने सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण सर्वच मंडळाचे आभार आणि कौतुक केले .





Social Plugin